Share

Narayan Rane | “…आम्ही समर्थ आहोत”; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राणेंचं प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई :  पुण्यामध्ये काल राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेदांत प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला होता. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण राहिलं नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांचा पवारांवर हल्ला –

अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हतं. म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता.आम्ही समर्थ आहोत, असं म्हणत नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

तुम्ही आता बढाया मारू नका –

पुढे ते असं म्हणाले की, सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला.

दरम्यान, आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. दोन तास रोज द्यावे लागत होते. आज आपण ते वातावरण निर्माण करू, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं होतं
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!