Share

Atul Londhe | “एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे”

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे दीड लाख तरूणांचा रोजगार गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. हा प्रकल्प राज्यातून जाण्यासाठी सध्याच सरकार जबाबदार असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तर सत्ताधरी विरोधकांवर आरोप करत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अतुल लोंढे ?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणे ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. परंतु, त्यांनी हजारो युवकांना रोजगार मिळण्याची क्षमता असलेला प्रकल्प घालवून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही, असं म्हणत अतुल लोंढे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे. काल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे असंही म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशाल प्रकल्पासाठी उच्चाधिकारी समितीची 95 वी विशेष बैठक 15 जुलै 2022 ला झाली होती. त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार होते. वेदांता-फॉक्सकॉन’ हा विषय राजकारणाचा नाही. हा महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहे.

अनिल अग्रवाल यांच्यावर कोणाचे दडपण होते?

तसेच, उच्चाधिकार समितीने देखील उद्योगाला आवश्यक सोयी-सवलती देण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे केली होती. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला कसा, त्यासाठी ‘वेदांता’च्या अनिल अग्रवाल यांच्यावर कोणाचे दडपण होते?, असा सवालही त्यांनी केला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!