🕒 1 min read
जळगाव : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांवर आरोप करत आहेत. एकमेकांवर टीकेबाजी देखील करत आहेत. अशातच भाजप पक्षाचे खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले उन्मेश पाटील –
विरोधी पक्षात आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकावून त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, असा कळवळा दाखवणं आदित्य ठाकरे यांनी बंद करावं, असं म्हणत उन्मेश पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. उन्मेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, आता हे सगळं करण्यापेक्षा सत्तेत असताना आदित्य ठाकरे यांनी सेमी कंडक्टर पॉलिसी जर वेळेत आणली असती तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री असणाऱ्या वेदांताला आपल्या राज्यात आणखी मदत मिळाली असती.
आदित्य ठाकरेंकडे तेव्हा पेंग्विन आणायला वेळ होता –
तसेच, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ती ग्लोबल झाली पाहिजे ही आमची भावना आहे.मात्र जुन्या सरकारला त्यासाठी वेळ नव्हता. आदित्य ठाकरे कधी ग्रामीण भागाकडे फिरकले देखील नाहीत. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा त्यांच्याकडे पेंग्विन आणायला, परदेशात फिरायला घरी बसायला वेळ होता, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | “…आम्ही समर्थ आहोत”; शरद पवरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राणेंचं प्रत्युत्तर
- Ravi Rana । अनिल परबांवर टांगती तलवार, कुठल्याही क्षणी अटक होईल; रवी राणांचा मोठा दावा
- Sharad Pawar | वेदांत प्रकल्पावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला, म्हणाले…
- Eknath Shinde । परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी – एकनाथ शिंदे
- Ajit Pawar । आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती; अजित पवारांची शिंदे गटावर आक्रमक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
