Share

‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नुकसानीबाबत ३० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर बैठक घेण्याचे आदेश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री दादाजी भुसे यांची मुंबईत भेट घेऊन पीकविमा कंपनीकडून अग्रीम रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, विमा कंपनी आणि केंद्र सरकारमध्ये सेटलमेंट असल्याचा आरोप खासदार ओमराजे यांनी केला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सुरुवातीला सरकारी कंपन्या होत्या, मात्र नंतर खासगी कंपन्यांचा सहभाग केंद्र सरकारच्या आशीर्वादाने वाढला आहे. सोबत तीन वर्षाचा करार करण्यात आला आहे. राज्य सरकारने देखील खासगी पीकविमा कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून देखील केंद्र सरकार पीकविमा कंपनीशी संगनमताने पाठराखण करून कंपन्याना अभय देत शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. केंद्र सरकार व भाजपचे शेतकऱ्यांबद्दलचे बेगडे प्रेम समोर येत आहे. त्यामुळे पीकविमा कंपन्यावाले व केंद्रातील सरकारचे सेटलमेंट असल्याचा संशय येत असल्याचा आरोप खासदार ओमराजे यांनी केला आहे.

जिल्ह्यात २० ते २२ दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके वाळली आहेत. यानुषंगाने राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या सूचनेनुसार मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील १४ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर आल्यावर ही बाब निदर्शनास आणून दिली होती. जिल्ह्यातील महसूल, कृषी विभाग व पीकविमा प्रतिनिधींमार्फत चाचणी प्रयोग केले केले असून, याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी भेट घेतली. आयुक्त कृषी व सचिव यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना याबाबत तत्काळ बैठक लावावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिसूचना तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या असल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले. जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!