🕒 1 min read
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत राणे यांच्यासोबत असलेले भाजपा आमदार आशिष शेलार यांनीदेखील आता शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सिंधुदुर्गात लावण्यात आलेली जमावबंदी राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती, तो प्रसंगही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी शेलार म्हणाले की,’आज त्यांच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ते माननीय शरद पवार साहेब यांच्या कानशिलात एका माथेफिरुने मारल्याची दुर्दैवी घटना अख्ख्या देशाने पाहिली. पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशी प्रतिक्रिया दिली नाही. आणि हा तर मग केवळ वाक्यातला जर तरचा मुद्दा होता कानशिलात लगावण्याचा. त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली ते एका संकुचित मनोवृत्तीचं दर्शन एका संयमित पक्षासोबत राहूनसुद्धा शिवसेनेने केले आहे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, कालही शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होती की,’महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगनाचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक करण्यात आले. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत’.
महत्वाच्या बातम्या –
- ‘राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
