नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांची अर्धवट राहिलेली जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. दरम्यान आता यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप तसेच राणेंवर निशाना साधला आहे.
जेव्हापासून भाजप पक्षात नारायण राणे यांनी प्रवेश केला आहे. तेव्हापासून भाजप दहा फुट मागे जात आहे. एक दिवस असा येईल की, भाजप अर्ध्या फुटावर जाणार. भाजपाने हा इशारा समजून घ्यायला हवा. एक दिवस राणेंचा भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान आज कोकणवासियांनी मंत्री राणेंचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. कोकणवासियांत यावेळी मोठा उत्साह आणि उल्हास पहावयास मिळाला. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरूनच राणेंवर टीका केल्याचे दिसून येते. राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर सतत टीका केली जात आहे. दरम्यान दोन्ही पक्षामध्ये शाब्दिक वार सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नाशिक येथे संजय राऊत यांनी राणेंवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या

