Share

‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, सल्लागाराच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आक्रमक

Published On: 

चंडिगड : पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सल्लागाराने राजीनामा दिल्यानंतर सिद्धू आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ‘निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल’, असा इशारा सिद्धू यांच्याकडून करण्यात आला आहे.

सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर माली यांनी समाजमाध्यमावरून काश्मीरबाबत खळबळजनक विधाने केली होती. तसेच ती मागे घेण्यास देखील त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे प्रदेश काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी माली यांच्या हकालपट्टीची सूचना केली होती. माली यांनी राजीनामा दिल्याच्या काही वेळातच सिद्धू यांनी ही भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ‘राष्ट्रीय विषयांवर भाष्य करण्यापेक्षा सिद्धू यांना सल्ला देण्याचे काम माली यांनी करावे,’ अशी टीका केली होती. सिद्धू यांच्या विधानाबाबत विचारले असता, ते कोणत्या संदर्भात बोलले ते पाहू असे उत्तर रावत यांनी दिले. पंजाबचे अध्यक्ष आहेत त्यांना अधिकार आहेत, असे देखील रावत म्हणाले.

दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी शुक्रवारी(२७ ऑगस्ट)राजीनामा दिला असून काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आहे. माली यांनी हा राजीनामा नसून सिद्धू यांना सल्ला देण्याच्या भूमिकेपासून बाजूला होत आहोत असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!