नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना झालेली अटक, सुटका या नाट्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांची यात्रा सुरु केली आहे. दरम्यान आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाना साधला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आपण कायम सभ्यता पाळायची. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. बाळासाहेबांचा एक मंत्र होता, जिओ और जिने दो. उगाच आम्ही कोणाला अंगावर घेणार नाही. पण अंगावर आला तर त्याला सोडणार नाही. आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्याच्या जत्रा केल्या आहेत. असा टोला लगावत त्यांनी राणेंवर निशाना साधला आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा का काढायला सांगितले त्याचेही कारण माहिती असल्याचे म्हटले आहे. मला मोदींबद्दल अधिक माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी शिवसैनिकांना कानमंत्रही दिल्याचे दिसते.
महत्त्वाच्या बातम्या
- सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस राहणार बँका बंद; जाणून घ्या
- पुण्यातील खेळाडूंच्या सेवेत ‘पुण्यदशम’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
