Share

भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात – सावंत

Published On: 

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे.भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे.भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सोमवार दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी केली आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ,घंटा व शंख वाजवून मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे ॥ हा नारा देत आंदोलन करावे. अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.  केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्ण येण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाला पुन्हा मंदिरांचे राजकारण करायचे आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार? असा सवाल कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सावंत म्हणाले, जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत.

कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिला आहे. सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये! असं देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!