जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सख्येत वाढ होत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रकृती खालावत असून यातून रुग्णांचा मृत्यूही होत आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत घरीच राहत आहेत. बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करत त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येऊन कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठकीत सागिंतले.
दरम्यान टोपे म्हणाले, कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाइकांना आणून देण्याची सक्ती खासगी रुग्णालयांकडून करण्यात येत असून हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे त्याची मागणी करावी. तर जिल्हा प्रशासनाने आवश्यक असलेली इंजेक्शन मागणीनुसार पुरवावीत. परंतु यापुढे कुठल्याही रुग्णांना इंजेक्शन आणण्याची सक्ती न करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करावा, असेही ते यावेळी म्हणाले.
एकीकडे जालना जिल्ह्यात कोरोना मृत्युंची संख्य दिवसागणिक वाढत आहे. रुग्ण बाधितांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार होऊन रुग्ण बरे होऊन घरी जावेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर वाढवावेत. बेडची क्षमता वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटर अथवा दवाखान्यात आणण्यासाठी प्रशासनाने वाहनांच्या संख्येत वाढ करावी. जालना शहरात विद्युत दाहिनी उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री मंत्री टोपे यांनी या वेळी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
