मुंबई – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकार नागरिकांना मोफत लस देण्याचं गांभीर्याने विचार करत आहे परंतु कोरोना महामारी मुळे राज्यसरकार आर्थिक संकटात सापडले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक सक्षम असणाऱ्या नागरिकांनी पैसे देऊन लस घ्यावी असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यात सरसकट लोकांना लस मोफत द्यायची का याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तसेच मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांची आहे.
राज्यात वय वर्ष 18 ते 45 मध्ये पाच कोटी नागरिक येतात. याचा अर्थ या नागरिकांना 10 कोटी लसींचे डोस लागणार आहेत. सरसकट सगळ्यांना लस मोफत द्यायची झाली तर साधारण राज्य सरकारवर चार हजार कोटींचा भार येऊ शकतो. त्यामुळे सरसकट लस सगळ्यांना मोफत देण्याऐवजी गरिबांनाच लस मोफत द्यावी, ज्यांना परवडत त्यांनी पैसे देऊन घ्यावी असेही काही मंत्र्यांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

