Share

ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार

Published On: 

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकते प्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याची तक्रार कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नेमलेले समन्वयक भारतीय प्रशासन सेवेतील आश्विन मुद्गल यांच्याकडे भाजप आ.श्वेता महाले यांनी केली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाचा निष्क्रिय कारभार उघड केला आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीची नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती व आयुक्त अमरावती यांच्याकडे केली आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनची नोंदणी करून शासनाकडे मागणीच केलेली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. ही बाब आ. श्वेता महाले यांनी लक्षात आणुन देताच जिल्हा प्रशासनाने तातडीने वाढीव ऑक्सिजनची मागणी शासनाकडे नोंदवण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

आ. श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पत्र देऊन तथा दूरध्वनीद्वारे जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता, मागणी आणि पुरवठा याबाबत कल्पना दिली आहे. जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी ८ टनापेक्षा जास्त आहे. परंतु जिल्ह्यात केवळ ५ किंवा त्यापेक्षा कमी पुरवठा होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय दवाखान्यात लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदवलेली आहे. परंतु या मागणीत खासगी दवाखाने समाविष्ट नसल्याने खासगी दवाखान्यात लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पत्रात म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!