Share

भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ

Published On: 

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवली या भागात दोन कोविड केअर सेंटर्स प्रारंभ करण्यात आले. या दोन्ही सेंटर्सचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. यामुळे मुंबईकरांच्या सेवेत आणखी 150 ऑक्सिजनयुक्त खाटा दाखल झाल्या आहेत.

अंधेरी पूर्व येथे कोळडोंगरी येथे रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि केशव सृष्टी ट्रस्टच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. इस्कॉन आणि इतरही संस्था सुद्धा यात विविध मदत देत सहभागी झाल्या आहेत. आज लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा दिलासा यातून मिळणार आहे. नित्यानंद महापालिका शाळा, अंधेरी पूर्व येथे स्थापन करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये 24 बाय 7 डॉक्टर्स आणि वैद्यकीय चमू आहेत. ऑक्सिजन, रूग्णवाहिका, समुपदेशन आणि इतरही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संजय पांडे यांच्यासह इतरही यावेळी उपस्थित होते.

भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कांदिवली पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आज उदघाटन केले. भुराभाई आरोग्य भवन, येथे या कोविड सेंटरमध्ये 117 ऑक्सिजन बेड्स असून, ते आता मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. या कोविड सेंटरला पॅथॉलॉजी आणि डिजिटल एक्सरे सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उदघाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, अतुल भातखळकर, भाई गिरकर, रा. स्व. संघाचे महानगर संघचालक सुरेशजी भगेरिया इत्यादी यावेळी उपस्थित होते.

तिसऱ्या  एका कार्यक्रमात भाजपाचे मुरजी पटेल यांच्या जीवनज्योत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रूग्णालयात दाखल होईस्तोवर गरजू रूग्णांना प्रथमोपचार म्हणून याचा वापर करता येतो. या संस्थेतर्फे गणेश मंडळ, सोसायट्या यांना मोफत सॅनेटायझर किट, ऑक्सिमीटर्स, तापमान मोजण्याचे उपकरण सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचेही प्रतिनिधिक वितरण देवेंद्र फडणवीस यांनी केले. सध्याच्या या संकटात मानवतेची सेवा हेच सर्वांचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. इतरांनी सुद्धा अशा अनेक उपक्रमांतून समाजासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!