Share

‘सहकारी पतसंस्थांकडे पाच हजार कोटींचा राखीव निधी, त्यातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारा’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थांच्या आहेत. अशा ५,५४८ पतसंस्थांकडे राखीव असलेल्या ५ हजार कोटी रुपयांतून प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी राज्य शासनासह मुख्य सचिव व आरोग्य, वित्त व सहकार विभागांच्या प्रधान सचिवांना ८ जूनपूर्वी शपथपत्राद्वारे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था अधिनियमानुसार, पतसंस्थांना झालेल्या नफ्यातील २५ टक्के रक्कम जिल्हा बँकांकडे राखीव निधी स्वरूपात ठेवावी लागते. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थांचा अशाप्रकारे सुमारे पाच हजार कोटी रुपये इतका राखीव निधी राज्यभरात जमा असल्याचा दावा अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला.

या राखीव निधीतून कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यात यावे. तूर्तास कोविड रुग्णांचे आणि नंतर पुढे सुपरस्पेशालिटी म्हणून त्यात सर्वांवर उपचार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. पतसंस्थांचे सर्व सभासद शासकीय कर्मचारी आहेत. हे कर्मचारी खासगी रुग्णालयात उपचार घेतात आणि त्याचा परतावाही शासनास द्यावा लागतो.

मात्र, राखीव निधीतून उभारलेल्या रुग्णालयात या कर्मचाऱ्यांवर मोफत तर इतर सामान्य नागरिकांवरही सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून दिल्यास शासनाचा खर्च वाचेल. या रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी शासनाने एखादी शिखर संस्था तयार करावी. यासंबंधी तत्काळ धोरण निश्चित करावे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार २५ टक्के राखीव निधी या संस्था शासनाच्या पूर्वपरवानगीने जनहितार्थ वापरू शकते, याकडेही अॅड. ठोंबरे यांनी याचिकेतून लक्ष वेधले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!