Share

गिरीश कुबेर यांनी हे धाडस कोणाच्या जीवावर केले याची माहिती मिळाली पाहिजे : नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप देखील काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनीही गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. तसंच कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलंय. ‘लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह लेखन केले आहे. या लेखनाबद्दल गिरीश कुबेर यांचा मी जाहीर निषेध करतो.

त्यांच्या या लेखनामुळे मराठा समाजाला दुःख वाटत आहे. कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून हे लेखन केले आहे, त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही’, असं ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील गिरीश कुबेर यांचा निषेध केला असून या पुस्तकावर महाराष्ट्रासह देशभरात कायमची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. तसेच, या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या संस्थेला देखील त्यांनी पत्र लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!