Share

सुबोध कुमार जयस्वाल CBI संचालक झाल्याने ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार?

Published On: 

मुंबई – 1958 च्या महाराष्ट्र तुकडीचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन वी रमण आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीनं काल घेतलेल्या बैठकीत ही निवड केली.

जयस्वाल सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत. यापूर्वीचे सीबीआय संचालक ऋषी कुमार शुक्ला यांच्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हे पद रिक्त होतं.दरम्यान, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून जयस्वाल यांचे राज्य सरकारसोबत खटके उडाले होते. राज्य शासनाशी पटत नसल्याने प्रतिनियुक्तीवर केंद्रात परतलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांना केंद्राने सीबीआय प्रमुख केल्याने राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मु्ंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त होते. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पोलिस खात्याची इंत्यभूत माहिती आहे. याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय स्थितीची आणि नेते मंडळींनाही ते जाणून आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि केंद्र सरकारमध्ये पुन्हा खटके उडण्याची चिन्हे आहेत.

सुबोध कुमार यापूर्वी दिल्लीत भारताची गुप्तचर संस्था म्हणजे रिसर्च अँड अँनालिसिस विंगमध्ये काम केले आहे. दत्ता पडसलगीकर यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

फेब्रुवारी २०१९ ते जानेवारी २०२१ म्हणजे जवळपास २ वर्षांचा त्यांचा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अनुभव आहे. याशिवाय ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्तही होते. जुलै २०१८ मध्ये ते मुंबईच पोलिस आयुक्त झाले. त्यांनतर सुबोध कुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र (ATS) दहशतवादविरोधी विभागातही काम केले आहे. महाराष्ट्रातील २० हजार कोटींच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) सुबोध कुमार जयस्वाल हे प्रमुख होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!