Share

सेवा भरती नियम मंजुर ; मनपा नोकर भरती मार्ग मोकळा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :सेवा भरती नियमास मंजुरी नसल्याने ,आकृतिबंध मंजूर असूनही सदर पदे सरळ सेवा व पदोन्नतीने भरताना अडचणी येत होत्या. शुक्रवारी शासनाने या सेवा भरती नियमाला मंजुरी दिली. यामुळे मनपा नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनपाचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या वादात अडकलेला आकृतिबंध शासनाने दोन वेळा फेटाळला होता. अखेर जुनाच आकृतिबंध नव्याने तयार करुन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्याला काही महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली. यात महापालिकेच्या आस्थापनेवर शासन मंजूर ३६ कार्यरत कर्मचारीनिहाय व्यपगत पदे वगळून यापूर्वीची मंजूर ४,७६३ पदे व नवीन ९५३ पदे यासह महापालिकेच्या एकूण ५७१६ पदांच्या आकृतिबंधास शासन मान्यता देण्यात आली. आकृतिबंधानुसार उपलब्ध होणारी पदे आवश्यकतेप्रमाणे महापालिकेच्या आस्थापना खर्चाची ३५ टक्के ही मर्यादा लक्षात घेऊन भरण्यात यावीत. आकृतिबंधातील पदांसाठी व वाढीव पदांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी किंवा अनुदान शासनाकडून महापालिकेस दिले जाणार नाही, असेही जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या आकृतीबंधास मंजूरी मिळाल्यानंतर सेवा भरती नियमांना देखील तातडीने मंजूरी मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

मात्र दुसNया लाटेतील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढण्यास सुरूवात झाल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा मागे पडला. दरम्यान नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांनी सेवा भरती नियमांची संचिका मंजूरीसाठी मंत्र्याकडे पाठवली होती. त्याला आता मंजुरी मिळाल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आवश्यक त्या सुधारणासह महाराष्ट्र शासनाने सदर सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे. शुक्रवारी मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे मनपा सेवा भरती नियम हस्तांतरण केले. सेवा भरती नियमा नंतर लवकरच बिंदु नामावली व रोस्तर ही मंजूर करून घेण्यात येणार आहे. जर कोरोनाची तिसरी लाट आली नाही तर पुढील पाच ते सहा महिन्यांत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल.असे पाण्डेय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!