🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी निगडित जमीन खरेदी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नवाब मलिकांची आज पहाटेपासून ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान भाजप नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. “अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. ठाकरे सरकारने कितीही दादागिरी आणि माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही,” असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारल आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात सायंकाळी बैठक होणार आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


