Share

भारतीय माजी गोलंदाज अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक होणार!

Published On: 

मुंबई: भारतीय माजी गोलंदाज अजित आगरकर पुन्हा क्रिकेटमध्ये एका नवीन अवतारात उतरण्यास तयार आहे. दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या बॅकरूम स्टाफमध्ये भर घालणार आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी दिल्ली शेन वॉटसन आणि अजित आगरकर यांच्याशी करार करणार आहे. दोन्ही माजी अष्टपैलू खेळाडू मुख्य प्रशिक्षक, रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करतील.

अजित आगरकर त्याच्या जुन्या संघात म्हणजेच दिल्लीयामध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. आगरकर २०११ ते २०१३ पर्यंत आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळला आहे. त्याआधी तो २००८ ते २०१० पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.आगरकरने कधीही आयपीएल संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेले नाही आणि तो १५ व्या हंगामात प्रशिक्षकपदी पदार्पण करणार आहे.

आयपीएलमध्ये बरेच वर्ष खेळाडू राहिलेला वॉटसनही या मोसमात प्रशिक्षकपदी पदार्पण करणार आहे. तो सहाय्यक प्रशिक्षक असू शकतो. पाँटिंगच्या शिफारशीनुसार वॉटसनची निवड करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. वॉटसनची आयपीएल कारकीर्द प्रदीर्घ होती आणि त्याने चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व करताना १४५ सामने खेळले आहेत.ज्यात त्याने राजस्थान आणि आरसीबीचे कर्णधारपदही भूषवले. त्याने २०२० मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!