Share

नवाब मलिकांना ईडीकडून अटक! मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्र्यांमध्ये सायंकाळी बैठक

Published On: 

मुंबई : नवाब मलिक यांची ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस दलासोबतच आता ईडी कार्यालयाबाहेर सीआरीपीएफची तुकडी देखील दाखल झालेली आहे. नवाब मलिकांना जेजे रुग्णालयाकडे नेण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात सायंकाळी बैठक होणार आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी आज पहाटेच धडकले होते. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केली होती. दरम्यान ईडीने त्यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!