Share

“विराट सुपरह्युमन आहे तर धोनीच्या रक्तात बर्फ वाहते” ; शेन वॉटसनने केली माजी कर्णधारांची प्रशंसा

Published On: 

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने विराट कोहली आणि एमएस धोनी या भारताच्या दोन्ही माजी कर्णधारांच्या नेतृत्वशैलीची तुलना केली आहे. ज्यात त्यांने दोघांना “सुपरह्युमन” म्हटले आहे. विशेष हे आहे कि वॉटसन या दोघांच्या कर्णधारपदात खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सोबत विराटच्या नेतृत्वाखाली आणि चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीच्या नेतृत्वाखाली कामगिरी केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वॉटसन या दोघांबद्दल बोलला आहे. तो म्हणला “विराटने एक लीडर म्हणून अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत, ज्या प्रकारे तो खेळाडूंना पुढे जाण्यास प्रेरित करतो, त्याला स्वतःकडूनही खूप अपेक्षा आहेत आणि तो खेळतो त्या प्रत्येक खेळात तो ते आणतो. माझ्यासाठी विराट हा सुपर ह्युमन आहे, त्याला त्याच्या आसपासच्या खेळाडूंना कसे पुढे ढकलायचे हे माहित आहे. विराट हा अतिशय चांगला माणूस आहे, तो मैदानाबाहेरही संतुलित असतो , त्याच्याकडे असलेले ज्ञान आकर्षक आहे. विराटसोबत आरसीबीमध्ये काम करणे हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.”

तर चेन्नईच्या थालाबद्दल सांगताना वॉटसन म्हणाला “एमएस धोनीच्या नसांमधून बर्फ वाहत आहे, संघातून दडपण बाहेर काढण्याची त्याची क्षमता आहे, तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे याची तो खात्री देतो. त्याला माहिती आहे की स्वतःसाठी आणि त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी काय काम करते. तो विश्वास ठेवतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!