Share

ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे निधन; राहत्या घरी घेतला आखेरचा श्वास

Published On: 

पुणे : जेष्ठ मराठी नाट्य आणि सिने आभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी कर्वे नगर येथील निवासस्थानी आखेरचा श्वास घेतला. किर्लोस्करवाडी येथे ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीकांत मोघे हे दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होते.

श्रीकांत मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुणे आणि मुंबई येथे गेले. शाळकरी वयापासूनच श्रीकांत मोघे हे नाट्य-अभिनयाकडे वळले. कलाविश्वात नावारुपास येणाऱ्या या अनुभवी कलाकारानं दिल्लीत वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. सांगली येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकिर्दीत ६० पेक्षा जास्त नाटकं, तर ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. ‘तुज आहे तुजपाशी’, ‘गरुडझेप’, ‘लेकुरे उदंड जाहली’ यासारखी नाटकं शिवाय ‘मधुचंद्र’, ‘सिंहासन’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही खुप गाजल्या. पु.लं. देशपांडे यांच्यासोबत श्रीकांत मोघे जवळपास ५० वर्षे कार्यरत होते. श्रीकांत मोघे यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर अभिनयाचा ठसा उमटवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!