मुंबई : यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सचे दुःखद निधन झाले आहे. यामुळे चाहत्यांसह त्यांच्या सहकलाकारांना धक्का बसत असून आता आणखी एका प्रसिद्ध स्टारचे निधन झाले आहे. या लॉकडाऊन काळात आणखी एका हिंदी चित्रपट सृष्टीतील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
We have lost another gem. I have known her since I was a kid and she was family, a superb artist and a fantastic human being, innalillahe wa innailaihe raajeoon. Rest in peace kunkum aunty ???? #ripkumkum #kumkum pic.twitter.com/CT60alQbOC
— Naved Jafri (@NavedJafri_BOO) July 28, 2020
अभिनेत्री कुमकुम यांचा वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. 22 जुलै 1934 रोजी कुमकुम यांचा जन्म बिहारच्या शेखपुरा या गावी झाला होता. त्यांचे मुळ नाव ‘जैबुनिस्सा’ असे होते.
कुमकुम यांनी आपल्या पहिला चित्रपट ‘गंगा मैया तोहे पियारी चढ़ाईबो’ (1963) या भोजपुरी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.त्याचबरोबर त्यांनी मदर इंडिया, कोहिनूर, एक सपेरा एक लुटेरा आणि दौरा अशा प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी आपली महत्वाची भुमिका बजावली आहे.
दरम्यान,काल बॉलिवूड मधील साहस दृश्यांच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या परवेज खान या ऍक्शन डिरेक्टरचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी, म्हणजेच २७ जुलै २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. ज्यानंतर सकाळी तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
पवार बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, तर मुख्यमंत्री…भाजपा आमदाराने केली खोचक टीका
“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल”; राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्रातून दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

