🕒 1 min read
मुंबई: बकरी ईद अवघ्या ४ दिवसांवर आली असून शासनातर्फे स्पष्ट नियमावली न आल्याने मुस्लिम समाजात नाराजी आहे. तर कुर्बानी देण्याला या दिवशी महत्व असल्याने सामुहिक कुर्बानीस परवानगी द्यावी, मशिदी खुल्या करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे. तर, ऑनलाइन बकरी खरेदीचा पर्याय देण्यात आला असून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या नागरिकांना बकरी देण्यात येईल असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
आज बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली होती. महत्वाचे म्हणजे बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल”; राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्रातून दिला इशारा
यावर आता भाजपा नेत्यांनी टीका सत्र सुरु केल्याचे दिसून येत आहे. पूर्व कांदिवलीचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘काही वर्षांपूर्वी हिंदू दहशतवादाचे तुणतुणे वाजणारे शरद पवार सध्या कोरोनाच्या आडून राम मंदिराचा विरोध करतायत. मंदिराचे भूमीपूजन करून करोना जाणार काय? असा सवाल करणारे शरद पवार बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, मुख्यमंत्री त्यांची री ओढतायत. आता ईद साजरी करून करोना जाणार आहे काय?,’ अशी जहरी टीका ट्विटर द्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंना घरा बाहेर पडू देणार नाही, गोळ्या घातल्या तरी चालतील; मराठा आंदोलक आक्रमक
काही वर्षांपूर्वी हिंदू दहशतवादाचे तुणतुणे वाजणारे शरद पवार सध्या कोरोनाच्या आडून राम मंदिराचा विरोध करतायत. मंदिराचे भूमीपूजन करून करोना जाणार काय? असा सवाल करणारे @PawarSpeaks बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, मुख्यमंत्री त्यांची री ओढतायत. आता ईद साजरी करून करोना जाणार आहे काय? pic.twitter.com/qUwHu0WXgg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2020
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. ‘राम मंदिर बांधून कोरोना जाणार का? असं विचारणारे श. प. कुर्बानी साठी बैठक घेतात, मुख्यमंत्र्यांना मार्ग काढण्यास सुचना करतात.. कुर्बानी ने कोरोना जाणार म्हणजे’ अस ट्विट करत दरेकर यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
नेते राजीव सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर साधला निशाणा; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
