Share

“तिच्याशी ब्रेकअप केल्यानंतर मी बर्बाद झालो..” प्रतिक बब्बरचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : बॉलीवूडमध्ये असे काही स्टार किड आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांसारखी लोकप्रियता मिळालेली नाही. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर यांचे नाव घेता येईल. त्यांच्या मुलाला प्रतिकला अजूनही बॉलीवूडमध्ये स्वताची ओळख तयार करण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे. आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्यांचे झालेले ब्रेकअप. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपल्या नात्याविषय़ीच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रतिक बब्बरला कमी वयातच मोठे मानसिक धक्के बसल्यानं तो काही काळ व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून आले होता . त्यामुळे तो अद्यापही संघर्ष करताना दिसतो आहे. लहानपणी त्याला मातृशोकाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यानं जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा त्यातून समोर आलेलं अपयश याचाही परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर झाल्याचे दिसून आले आहे. आता प्रतिकच्या ब्रेक अपची बातमी समोर आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेक अपच्या प्रसंगाविषयी प्रतिकनं सांगितलं आहे. एमी आणि प्रतिक हे एक दिवाना था या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

एका मुलाखतीमध्ये प्रतिकनं सांगितलं की, माझ्यासाठी तो काळ मोठा वेदनादायी होता. त्यावेळी मी नैराश्यातच गेलो होतो. माझा एक दिवाना था तेव्हा चांगला चालला होता. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला होता. त्यावेळी मी एमीच्या प्रेमात पडलो. मात्र मी तिच्या प्रेमात पडणं हीच माझी चूक होती. त्यानंतर काय होणार याची कल्पना काही मला नव्हती. या साऱ्याची किंमत मला चुकवावी लागली. असेही प्रतिकनं सांगितलं होतं. 2019 च्या ब्रेक अपनंतर प्रतिकनं सान्या सागरशी लग्न केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!