Share

सलमान म्हणाला,आमचे चित्रपट टॉलीवूडमध्ये का चालत नाही?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सलमानची एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तो आता दाक्षिणात्य चित्रपटातील मोठं नाव असणाऱ्या चिरंजीवी यांच्या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमाननं बॉलीवूड आणि टॉलीवूड याविषयी महत्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे.

सलमान म्हणाला, बॉलीवूडला आणखी यशस्वी व्हायचं असल्यास त्याला आणखी हिरोएझमची गरज आहे. जो सध्या तुम्हाला टॉलीवूडमध्ये पाहायला मिळतो. सलमान हा चिरंजीवींच्या गॉडफादरमध्ये काम करणार आहे. याप्रसंगी सलमाननं त्याबाबत काही गोष्टी मांडल्या आहेत. मी बऱ्याच काळापासून चिरु गरु यांना ओळखतो. ते आणि आता त्यांचा मुलगा रामचरण हे माझे मित्र आहेत. रामचरणनं तर आरआरआरमध्ये जबरदस्त भूमिका केली आहे. ते पाहून मी तर प्रभावित झालो आहे. हे सर्व मी जेव्हा पाहतो तेव्हा काही प्रश्न मला पडतात. त्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, बॉलीवूडच्या फिल्म्स या टॉलीवूडमध्ये का हिट होत नाहीत?

टॉलीवूडचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर बॉलीवूडमध्ये यशस्वी होताना दिसतात. पण बॉलीवूडचा टॉलीवूडमधील कमाईचा टक्का हा कमी होताना दिसतो आहे. सलमान या सगळ्या गोष्टींविषयी आयफा 2022 पुरस्कारामध्ये भाष्य केले आहे. त्याची पत्रकार परिषद ही मुंबईमध्ये पार पडली आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या 20 आणि 21 मे 2021 रोजी अबु धाबी येथे होणार आहे. सलमाननं या पत्रकार परिषदेतून बॉलीवूडला आणखी हिरोइझमची गरज असल्याचे सांगितले आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा बॉलीवूडला होईल.

साऊथमध्ये सध्याच्या घडीला हिरोइझम मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतो तेव्हा त्याला हिरोइझम पाहायचं असतं. त्यासाठी तो मोठं तिकिट काढून तुमचा चित्रपट पाहायला येतो. मात्र चित्रपटामध्ये त्याला हव्या त्या गोष्टी दिसत नाही तेव्हा तो निराश होतो. आणि आम्ही सध्या हिरोइझम असलेले चित्रपट तयार करत नसल्याची खंत सलमाननं यावेळी व्यक्त केली. त्यामुळे त्याचा मोठा फटका आम्हाला बसतो. आता जर कमाई करायची असेल तर हिरोइझम केंद्रित चित्रपट आपल्याला तयार कराव्या लागतील.

सलमान म्हणतो, हिरोइझम हे नेहमीच काम करतं. तो प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. त्यानिमित्तानं प्रेक्षकांशी वेगळं नातं दिग्दर्शक कनेक्ट करतो. आम्ही हा सगळं सलीम जावेद यांच्या काळात पाहिलं आहे. हिरोइझम काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. तो बॉलीवूडचा काळ सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात टॉलीवूडमधील चित्रपट हटक्या पद्धतीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या तुलनेत जास्त हिरोइझम असल्याचे सलमाननं म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

“…म्हणून सदाभाऊंच्या ** ला आग लागली असावी”- अमोल मिटकरी

दिग्दर्शक राजामौली आणि आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या या कृतीने वेधलं लक्ष

“राज्यपालाच्या पदावर आहेत म्हणून, नाहीतर…”- नाना पटोले आक्रमक

“माझी आई माझ्याशी २६-२७ वर्ष खोटं बोलली…”, केएल राहुलनं सांगितला आपल्या नावाबाबतचा किस्सा!

मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!