Share

हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू; एसटीही बंद

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते ७ मार्चदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली आहे. हिंगोलीत रविवारी एकाच दिवसात ३२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात दुध विक्री केंद्र, दुध विक्रेते यांना सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, मेडिकल, पेट्रोलपंप, रस्त्याचे कामे, पाणीपुरवठा, महावितरण, स्वच्छता आणि परवाणगीप्राप्त वाळू पुरवठा सुरू राहणार आहेत. या संबंधित अधिकारी कार्मचाऱ्यांना ये-जा करण्याची मुभा असणार आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारात, गल्लीत, गावात बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

७ दिवस एसटीही बंद
जिल्ह्यात संचारबंदी लागून असल्यामुळे ७ मार्चपर्यंत आगारातून एकही बस धावणार नाही, असे आगारप्रमुख अभिजित बोरीकर यांनी सांगितले. येथील आगारात ३२ बस आहेत. या बसेसच्या दररोज १३० फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून आगाराला साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न रोज मिळते. आता ७ दिवस बस बंद असल्यामउले आगाराचे २८ ते ३० लाखांचे उत्पन्न बुडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!