मुंबई : कोणत्याही मोठ्या शहरांचा ( महानगरांचा) जलद विकास होण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, नाशिक ,औरंगाबाद आणि नागपूर अशी ४ महानगर आहेत. मुंबई आणि पुणे या दोन सर्वात मोठ्या महानगरात वाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारी वाहतूक त्यामानाने एवढी विकसित नाही.
परंतु आता या दोन शहरांना जोडणारी सेमी हायस्पीड रेल्वे लवकरच उपलब्ध होणार आहे. हा मार्ग १२०० दिवसांत म्हणजेच सुमारे ४ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग सध्या नाही. या दोन शहरांदरम्यान प्रवास करावयाचा असल्यास रस्त्यानेच प्रवास करावा लागतो आणि त्याला ४-५ तासांचा कालावधी लागतो.
नाशिक आणि पुणे ही दोन शहर रेल्वे मार्गाने जोडण्याची मागणी गेले अनेक वर्ष होत आहे. मात्र आत पुणे आणि नाशिक ही दोन शहर आता रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. या रेल्वे प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल, साखर ,शेती उत्पादनांच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पारेशनतर्फे (महारेल) तर्फे राबविण्यात येणार आहे.