मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. (Chhatrapati Sambhaji strike for Maratha reservation) याला संपूर्ण राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. दरम्यान सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी धमकी देणाऱ्यांना इशाराही दिला आहे.
यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना धमकी बद्दल विचारले असता ते म्हणाले की, ” मला धमक्या आल्या तर मला काहीच करावं लागणार नाही. माझा फक्त छत्रपती घराण्यात जन्म झाला आहे. कोट्यवधी पाईक आहेत.” तसेच उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणयांचे आपल्याला फोन आले होते. पण प्रवासात असल्याने त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान सरकारने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्याचं आश्वासन दिलं. पण हा निधी मिळाला नाही.पुणे आणि कोल्हापुरात सारथीचं केंद्र सुरू झालं. पण आठ महिने झाले. तिथे कोर्सेस सुरू नाही. तसेच सारथीला ५०० कोटी रुपये द्यावे ही आमची मागणी होती. मात्र या खर्चाची ब्ल्यू प्रिंट अजूनही तयार झाली नाही. असं ते म्हणाले आहेत. तसेच १४ ऑगस्टला १३ वसतिगृह सुरू करू असं सरकारने सांगितलं. त्यातील एकही वसतिगृह सुरू झालेलं नाही. असे अनेक सवाल संभाजीराजे यांनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“… त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे पर्यायच राहिला नाही”, संभाजीराजेंची प्रतिक्रिया
“धोनीला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले”; पाकिस्तानी खेळाडूचे वक्तव्य
“…तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळया दगडाची रेष”, ईडीच्या छापेमारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

