मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
संभाजीराजे भोसलेंनी उपोषण सुरू करताना आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना संभाजीराजे भोसले म्हणाले, मी जी चळवळ सुरू केली आहे, त्यात समाजाला का वेठीला धरायचं, म्हणून मी ठरवलं, जे होईल ते होईल, आपण आमरण उपोषण करायला हवं. या मागण्यांसाठी मी स्वत: आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या वैभवात मी राहिलोय, ते पाहाता हे कठीण काम आहे. हे जाहीर केलं, तेव्हाही मला वाटलं हे मला जमेल का? पण माझा जन्म छत्रपतींच्या घराण्यात झाला आहे. मी जर हा लढा सोडवू शकलो नाही, तर मग काय उपयोग, असं संभाजीराजे भोसले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘जोपर्यंत हे तीन पक्ष एकत्र…’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
“…तर मला काहीच करावं लागणार नाही”,धमकी देणाऱ्यांना संभाजीराजेंचा इशारा
Saba Azad साठी Hrithik Roshan ची पहिली पोस्ट, नात्यावर शिक्कामोर्तब?
“धोनीला भेटून माझे स्वप्न पूर्ण झाले”; पाकिस्तानी खेळाडूचे वक्तव्य


