नवी दिल्ली: सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) हे राज्यसभेमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले असता त्यांची दाढी बघून उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी (Venkaiah Naidu) त्यांना ही दाढी आहे की मास्क? असा प्रश्न विचारला. आणि सभागृहात एकच हशा पिकला. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि अभिनेते सुरेश गोपी हे राज्यसभेमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले.मात्र त्यांचा नवीन लूक पाहून उपराष्ट्रपती गोंधळले. गोपी यांच्या हनुवटीवर करड्या रंगाचे मास्क आहे की त्यांची दाढी आहे असा प्रश्न उपराष्ट्रपतींना पडला. आणि त्यांनी थेट माईकवरुनच आपल्या हनुवटीजवळून हात फिरवत, “काय आहे हे ? मास्क की दाढी ?” असा प्रश्न विचारला.
हा प्रहा प्रश्न ऐकताच राज्यसभेतील इतर सभासदांमध्ये एकच हशा पिकला. हा हसण्याचा आवाजही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. मात्र सभासद हसत असताना गोपी यांनी, “हा माझा नवा लूक आहे सर” असे स्पष्टीकरण दिले. त्यावर उपराष्ट्रपतींनी हसतच, “ओके” म्हटले. त्यानंतर गोपी यांनी आपला मुद्दा मांडण्यास सुरुवात केली.सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. लाखोंच्या संख्येने या व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022 : दुष्काळात तेरावा महिना..! दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टनला १२ लाखांचा दंड
IPL 2022: दारुण पराभवानंतर कर्णधार केन खेळाडूंवर संतापला; म्हणाला ‘या’ कारणामुळे झाला पराभव
IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स
मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

