Share

आसाम मधील एका पत्रकाराला, प्रश्न विचारला म्हणून पोलिसांनी मारहाण केली.

Published On: 

🕒 1 min read

गुवाहाटी, आसाम: गाडी चालवत असताना हेलमेट वापरले नाही तर आपल्याला दंड भरावा लागतो. परंतु हे दंडाधिकारी जर स्वतःच विना हेलमेट गाडी चलवत असतील तर त्यांना दंड कोणी करायचा? अश्याच दोन पोलिसांना विना हेलमेट गाडी चालवताना पाहून आसामच्या गुवाहाटी येथे एका पत्रकाराने विचारणा केली असता त्याला पोलिसांनी मारहाण केली.

याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शहा आणि लाखी बारमान या दोघांवर भारतीय दंड विधान कलम ३४१, ३२३ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. दरम्यान चिरांगचे पोलीस अधिक्षक प्रणब बोरा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत, दोनही पोलिसांवर गुन्हा दाखल केला असून विभागीय चौकशीचे अहवाल वीस दिवसात देणार असल्याचे सांगितले.

जयंता देबनाथ (४७) असे पत्रकाराचे नाव असून, ते तेथील प्रतिदिन टाइम्स या वाहिणीसाठी काम करतात. सोमवारी (७ फेब्रुवारी) रोजी त्यांना वरील दोन पोलीस हवालदारांनी मारहाण केली होती. जयंता यांनी तुम्ही हेलमेट का घातले नाही ? असा प्रश्न पोलिसांना विचारला होता. याप्रकरणी बऱ्याच प्रादेशिक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी बातमी छापत या गुन्ह्याला विरोध केला होता. जयंता यांना पोलीस मारत असल्याचा एक व्हिडिओ देखील प्रसारित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!