नवी दिल्ली- तमिळनाडूमध्ये उद्यापासून शाळा आणि महाविद्यालये पुन्हा उघडण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळं शाळांमध्ये 9 वी ते 12वीचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यानं आजपासून शाळा सुरू होणार आहेत.
दिल्लीमध्ये आजपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू होणार असून 6 वी ते 8 वी चे वर्ग 8 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि मेघायलमध्येही निवडक वर्गांसाठी शाळा सुरू होत आहेत. शाळा उघडताना,वर्गात 50 टक्के उपस्थिती आणि कोरोना नियमावलीचं पालन या अटी सरकारनं घातल्या आहेत. गुजरातमधील शाळा देखील 2 तारखेपासून सुरु होणार आहेत.
दरम्यान, देशात काल उपचाराधीन कोविड रुग्णसंख्या 5684 नं कमी झाली. सध्या देशात 3 लाख 70 हजार 640 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. आज सकाळी संपलेल्या 24 तासात 36 हजार 275 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 97 .53 टक्के झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

