Share

औरंगाबादेतील शाळा,कोचिंग क्लासेस आता ‘या’ तारखेपर्यंत राहतील बंद

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पालिकेने आज (दि.२७) शाळा,कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय १५ मार्चपर्यंत वाढवला आहे.

शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. १८ फेब्रुवारी रोजी १०, १२ वी वगळता इतर सर्व वर्गांना सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा या निर्णयात फेरफार करत २८ फेब्रुवारी पर्यंत १० वी १२ वी वगळता संपूर्ण शाळा सक्तीने बंद करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता.

मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याविषयी सांगितले. सध्या शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

१८ तारखेला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांना येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थी आणि पालकांसाठी हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला होता. मात्र शहरात वाढणारी रुग्णसंख्या पाहता महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी १० आणि १२ वी चे वर्ग सोडून इतर सर्व वर्गाना १५ मार्च २०२० पर्यंत सक्तीने बंद ठेवण्याचे आदेश आज दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे पांडेय यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!