Share

‘बंद केसेस परत उघडून विरोधकांचा आवाज दाबला जातोय’

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत.

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजाच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा चित्रा वाघ करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना धमक्यांचे फोन आले होते.

दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यत नाकारता येत नाही.

पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे. त्याचवेळी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यावरून भाजप नेते संतप्त व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे. ‘ठाकरे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सौ. चित्राताई वाघ यांच्यावर जुनी केस ओपन करून गुंतवल जातंय. ज्यांच्या विरोधात सगळे पुरावे आहेत, त्या मंत्र्यांवर FIR होत नाही. मात्र, ज्या केसेस बंद आहेत त्या परत उघडून विरोधकांचा आवाज दाबला जातोय’, असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचा जाहीर निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!