Share

मोठी बातमी : अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद

Published On: 

पुणे : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्याने अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर २ मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

२ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यामुळे पुण्यातील असंख्य भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. परिणामी मोठ्या संख्येने भाविक एकत्र जमल्यास कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा वाढता धोका लक्षात घेवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थीच्या मुहर्तावर बंध ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज ८ हजारून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहेत. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने आपली मान वर काढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!