मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नसणे आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे. मुंबई वगळता राज्यात दुसऱ्या लाटेआधी ५ वी ते १२ वीच्या शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात आले होते.
यानंतर, दुसऱ्या लाटेच्या गंभीर स्थितीमुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आले. सध्याच्या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ जुलै पासून ८ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही निक्षण ठरवण्यात आले आहेत.
‘राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत. ज्या गावांत मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल तसेच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमताने केला असेल, अशा गावांत इ. ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मंत्री भुमरेंवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल तरीही पैठणमध्ये भाजप गप्प का?
- भाजपमध्ये पक्ष सदस्य होण्यापूर्वी आयारामांना मंत्रीपदाची संधी? चाकणकरांची टीका
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

