मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जातेय. मात्र, यात काही इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, आता याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केलीय. भाजपमध्ये आयारामांना संधी दिली जात असल्यावरुन त्यांनी भाजपला टोला मारलाय.
या संदर्भात चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केलीय. त्या म्हणाल्या की, ‘राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल.’
राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
भारतीय जनता पक्षातील सुमारे डझनभर मंत्र्यांचा राजीनाम घेण्यात आला आहे. या मंत्र्यांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही मंत्र्यांची बढती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नारायण राणे आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या खासदार भारती पवार यांचाही समावेश आहे. मात्र, याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या वतीने ही टीका करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कृपाशंकर सिंह कोण आहेत ? त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खरंच लाभदायक ठरेल का ?
- मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; महाराष्ट्रातून ४ मंत्र्यांची वर्णी
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- ‘या’ दिवशी होणार अजय देवगनचा ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ प्रदर्शीत
- ‘या’ अभिनेत्रीने केले कॅप्टन अमेरिकाला प्रपोज; पोस्ट व्हायरल


