मुंबई : विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह देऊन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (१२ मार्च) पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘काल मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे. बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलावलं आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो, मला विशेषाधिकार आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत हा विचारला जाऊ शकत नाही.’ तसेच घोटाळेबाजांवर कारवाई व्हायला हवी; घोटाळा काढणाऱ्यांवर कशी?, असा सवालही यावेळी फडणवीसांनी केला.
दरम्यान, राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- MP Budget 2022 : राज्यात २२ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करणार- जगदीश देवडा
- माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- फोन टॅपिंग प्रकरणातील सर्व माहिती केंद्राकडे सोपवली- देवेंद्र फडणवीस
- ‘लोकांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार आहे’ – विजय वडेट्टीवार
- तू तिसऱ्यांदा लग्न करू नको; यावर काय म्हणाली श्वेता तिवारी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

