🕒 1 min read
मुंबई : मार्च २०२१ महाराष्ट्रमध्ये झालेल्या ट्रान्स्फर घोटाळ्याचा फर्दाफाश मी केला होता. या संदर्भात उद्या सकाळी मला बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये मला बोलवले आहे, मी स्वतः त्याठिकाणी जाणार आहे. आणि पोलीस जी काही चौकशी करतील त्याला मी योग्य ते उत्तर देणार आहे. याचे कारण मी गृहमंत्री देखील राहिलेलो आहे, त्यामुळे पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी त्यांनी तपासणीमध्ये माझे सहाय्य मागितले आहे. तर मी निश्चितपणे ते देईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलले आहेत.
माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करण्यापेक्षा, ६ महिने सरकार कडे हा अहवाल पडला होता. त्या अहवालात कोणी कोणी व किती पैसे दिले. कोण पैसे देऊन कोणत्या पोझिशन ला गेलाय? व कोणत्या जिल्ह्यात गेलाय? अशी सर्व माहिती सरकारकडे असताना ६ महिने यावर कोणतीही कारवाई सरकारने केली नाही. तर सरकार वर कारवाई झाली पाहिजे? की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी बोलविले पाहिजे? असा सवाल माझा याठिकाणी आहे, असे फडणवीस म्हणाले.
तसेच मला या गोष्टीचा संतोष आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही सर्व माहिती सीबीआयला दिली आहे. केसची चौकशी सीबीआय कडून सुरु आहे. त्यामुळे चौकशीला काही महत्व नसल्याचे देखील सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
