🕒 1 min read
नागपूर: पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील महापलिका निवडणुकांवर परिणाम पडणार का, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. या अनुषंगाने शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी बैठक देखील घेतली होती. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची देखील भेट घेतली होती.
या सर्व घडामोडींवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, निवडणुका होत असतात, जय पराजय होत असतात. सगळेच जनं सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार राज्यात राहणार, असा विश्वास देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
