Share

स्कॅम १९९२- हर्षद मेहता स्टोरी सिरीजमधील ‘त्या’ सिनमुळे सोनी पिक्चर्सवर गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२’ ही वेबसिरीज प्रदर्शीत झाली होती. १९९२ मध्ये झालेल्या शेअर बाजारातील घोटाळ्यावर आधारीत ही वेब सिरीज तुफान गाजली. या सिरीजमध्ये ‘हर्षद मेहता’ची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधीचे कौतुक करण्यात आले होते.

स्कॅम १९९२ ही वेब सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण या वेब सिरीजचे निर्माते सोनी पिक्चर्सवर पुणे येथील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण या वेब सिरीजमधील एका सिनमध्ये कँलेडरवर कराड को ऑपरेटिव्ह बँकेचा लोगो दाखवण्यात आला आहे. हर्षद मेहता घोटाळ्यात बँक ऑफ कराडचा सहभाग होता. वेब सिरीजमध्ये या बँकेचे नाव बँक ऑफ कराज असा केला होता. घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने कारवाई करत १९९४ मध्ये या बँकेचे बँक ऑफ इंडियात विलगीकरण करण्यात आले.

यावरुन सोनी पिक्चर्सने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘बँकेने पैसा लाटण्याच्या दृष्टीने ही तक्रार दाखल केली आहे. तसेच संबधीत पोलीसांनी देखील कायद्याचा फेरविचार न करता गुन्हा दाखल केला. आम्ही केवळ वेब सिरीजचे प्रसारन केले. यासंदर्भात कोणतीही कायदेशीर हमी आम्ही निर्मात्याकडूंन घेतली नाही. तसेही असे काही साम्य अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा असे स्पष्टीकरण आम्ही प्रत्येक भागाच्या सुरुवातीला केले होते.’ असे सोनी पिक्चर्सकडून सांगण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!