मुंबई : शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी आपल्या गाडीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचं दिसत आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?, असा टीकेचा बाण चंद्रकांत पाटील यांनी सोडला. ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!’, असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा! https://t.co/AFBFkSE7Dn
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 20, 2021
तसेच जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध असे ते म्हणालेत.
तर शिवसेना खासदार भावना गवळी यांनीही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले. आक्रमक शिवसैनिकांकडून त्यामुळेच दगडफेक झाली असावी’ असे त्या म्हणाल्या. ‘पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगडफेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस पुढे गुडघे टेकून शिवसेनेनं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’; भाजपची जहरी टीका
- ठाकरे, पवार यांच्यासह १९ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींची महत्वाची बैठक
- ‘भाजपच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेलाय’; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- ‘राज ठाकरे यांना प्रसिद्धीची हौस ; पवारांसारख्या शक्तीस्थळावर हल्ला करताच आपोआप प्रसिद्धी मिळते’
- ‘आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका’; राज ठाकरेंच रोखठोक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

