मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीसंदर्भात गोरेगाव पोलिसात हा गुन्हा नोंद झाला आहे. काल रात्री हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यानं हा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे.
सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा चौथा गुन्हा आहे. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने ९ लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा अरोप तक्रारदाराने केला आहे. यापूर्वी मुंबईचे परमबीर सिंह यांना सेवानिवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने परमबीर सिंग यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
Mumbai | Another extortion case was registered by Mumbai Police against former Mumbai CP Parambir Singh in Goregaon Police station last night. This is the fourth extortion case registered against Singh. Suspended Mumbai Police officer Sachin Waze is also an accused in the case.
— ANI (@ANI) August 21, 2021
दरम्यान, ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात गेल्या आठवड्यात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. तसेच लूक आऊट नोटीस जारी केल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. याचबरोबर खंडणीच्या प्रकरणात गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या इतर २७ जणांना लवकरच अशाप्रकारची नोटीस जारी केली जाणार आहे. पोलिस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
तसेच काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंह यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी याला आव्हान दिले आहे. आयोगाकडे सोपवलेल्या तपासाची व्याप्ती आधीच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच या पुढील तपासासाठी काहीही शिल्लक नसल्याचे परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, काँग्रेसचा दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
- ‘हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेने सत्ता मिळवत राज्यात हिटलरशाही सुरू केली’
- तहसीलदार ज्योती देवरे सुसाईड ऑडिओ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

