Share

‘मुलगी झाली हो’ म्हणत अख्ख्या गावात वाटली जिलेबी!

Published On: 

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील एका कुटुंबात अनेक वर्षानंतर मुलगी जन्मली. साक्षात लक्ष्मीच घरात आली म्हणत त्या कुटुंबाने अख्ख्या गावात जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला. यामुळे गावात सकारात्मक संदेश गेला असून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याची रित तयार होत आहे.

एरव्ही प्रत्येकाला वंशाचा दीपक म्हणून मुलगाच हवा असतो. जेणेकरून तो आपल्या म्हातारपणाची काठी होईल. आपला सांभाळ करेल अशी अपेक्षा त्यामागची असते, मात्र, मुलगी कुणालाच नको असते. कारण मुलगी झाली तर तिच्या लग्नाचा प्रचंड खर्च, हुंडा, पालनपोषणाचा खर्च, तिच्या शिक्षणात बिनकामाची गुंतवणूक अशी मानसिकता असायची.

पण आता काळ बदलला आहे. मुलगी शिकू लागली, मुलाच्या खांद्याला खांदा देऊन आज ती प्रत्येक क्षेत्रात चमकू लागली आणि आज मुलगी जन्मली की ‘पहिली बेटी, तूप रोटी’ किंवा ‘पहिली बेटी, धन की बेटी’ असे सामाजिक बदल होताना दिसत आहे. याचाच प्रत्यय बोदवड गावात दिसून आला. येथील विजय गोविंदा गव्हाणे यांना मुलगी झाली.

खुप वर्षांनंतर घरात मुलगी जन्माला आली म्हणून घरातल्या प्रत्येकाच्या आनंदाला पारावर उरला नाही. आणि त्यांनी चक्क पूर्ण गावात जिलेबी वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला. समाजातील बदलती मानसिकता बघून आज खरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कष्टाचे चिज झाले हे खर्‍या अर्थाने म्हणता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!