Share

‘ही’ दोन कारणे सांगून आपण कुठेही फिरू शकतो…निर्बंधांतील विसंगतीमुळे सोशल मिडीयावर विनोदांचा पाऊस

Published On: 

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, गोरगरीब जनतेचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या काळात शिवभोजन मोफत देण्यात येणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले आहे.

दहा रुपयांची ही थाळी मागे कोरोना काळात पाच रुपयांना करण्यात आली होती. पण आता गरीब आणि गरजुंना ही थाळी मोफत मिळणार आहे. शिवभोजन योजनेतून सुमारे दोन लाख गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, शासनाच्या नियमांमध्ये अनेक विसंगती असल्याने सोशल मिडीयावर सरकारच्या या निर्णयांची खिल्ली उडवली जात आहे.

यासंदर्भात अनेक मिम्स, व्यंगचित्रे आणि विनोद सोशल मिडीयावर व्हायरल होत असून या माध्यमातून सरकारच्या कारभारातील फोलपणा नेटीझन्स दाखवून देत आहेत. ‘थोडक्यात सांगायचे तर …शिव भोजन खायला बाहेर पडलो आहे… आणि …शिव भोजन करून घरी निघालो आहे …ही दोन करणे सांगून आपण कुठेही फिरू शकतो’. असा विनोद सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शिवभोजन थाळी पार्सल आणायला गेलो तर माझ्यावर गुन्हा तर दाखल होणार नाही ना? संचार बंदी मध्ये शिवभोजन थाळी काय स्विगी वरून मागवयची का ? बाकी हॉटेल्स बंद असताना शिवभोजन थाळी केंद्रे ही शिवसैनिक चालवत असल्यानेच सुरु ठेवायला परवानगी दिली का ? असे देखील सवाल काही मंडळी अतिशय मार्मिक पद्धतीने आता उपस्थित करत आहेत.

शिवभोजन केंद्रांची संख्या फारच कमी असल्याने या केंद्रांपर्यंत गरजू वेळेत पोहचतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच शिवभोजन थाळी आणण्यासाठी बाहेर पडणे नव्या निर्बंधात बसणार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना यासाठी सूट मिळणार का ? जाण्यायेण्यासाठी ही गरीब जनता पैसे कुठून आणणार असा देखील मुद्दा उपस्थित केला जात आहे. यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरीही निर्बंधांमध्ये असलेली विसंगती नेटीझन्स यातून दाखवून देत आहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!