Share

शिवभोजन चालु पण संचार बंद… मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मिम्सचा पाऊस

Published On: 

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अखेर राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी माहिती दिली. मात्र, काय बंद काय चालू हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ‘शिवभोजन चालु पण संचार बंद’ अशी घोषणा केलीय. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडलाय. यातील काही निवडक मिम्स पाहूयात

शिवभोजन चालु पण संचार बंद…रस्त्यावरचा खाद्य स्टॉल चालु पण संचार बंद..
; एकुण काय तर बरचं चालु पण सगळं बंद..; ????
१५ दिवसाच्या कडक निर्बंधाच्या हार्दीक शुभेच्छा !!!

शिवभोजन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय म्हणजे भ्रष्ट्राचार करण्याची मुभा असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. शिवभोजन थाळीला आता वर्ष होत आले आहे. मात्र, त्याचा किती फायदा सामान्यांना झाला हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता घराबाहेर पडायचे असेल तर केवळ शिवभोजन थाळी हा एकमेव पर्याय असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

थोडक्यात सांगायचे तर …
शिव भोजन खायला बाहेर पडलो आहे …..
आणि …
शिव भोजन करून घरी निघालो आहे …
ही दोन करणे सांगून आपण कुठेही फिरू शकतो ????????

असेही जोक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा गमतीचा भाग असला तरी राज्यात शिवभोजन थाळी मिळण्याच्या ठिकाणांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यातच या केंद्रांकडे पार्सल सुविधा देण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा खरा किती फायदा होईल, या बाबत साशंकता कायम आहे. एकूणच काय तर, राज्यातील एकही गरजवंत उपाशी राहू नये, यासाठी व्यापक स्थरावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!