Share

नांदेड जिल्ह्यामध्ये मोबाईल व्हॅनव्दारे लसीकरणासह कोरोनाची चाचणी

Published On: 

नांदेड : तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये गावोगावी जावून संशयीत काेरोना रुग्णांची अँन्टीजन टेस्ट मोबाईल व्हॅनव्दारे करण्यात येत आहे. जिल्हा मधील  मुदखेड तालुक्यामध्ये कोराेनाचा कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या तसेच वाढता संसर्ग रोखणे तसेच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांच्या ब्रेक द चेन या माेहिमेला यशस्वी करण्याची करण्यासाठी तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये गावोगावी जावून संशयीत काेरोना रुग्णांची अँन्टीजन टेस्ट मोबाईल व्हॅनव्दारे करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी लसीकरण करण्याची क्षमता असलेल्या फिरत्या वाहनामध्ये ही संकल्पना आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, तहसिलदार दिनेश झांपले यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्यानुसार हे काम सुरु करण्यात आले आहे.

फिरते व्हॅन चाचणीवर लसीकरणाची सुविधा असल्याने ग्रामीण भागातील गरजु व गरिब रुग्णांना उपयोग होणार असल्याचे डॉ. राजेंद्र पवार यांनी या वेळी सांगितले. या सुविधेचा ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार दिनेश झांपले, डॉ. राजेंद्र पवार यांनी या वेळी केले आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामीण भागात समाधान व्यक्त केल्या जात आहे. ही व्हॅन दररोज परिसरातील दोन गावांमध्ये फिरत आहे. तसेच कोरोनाची रुग्णांची चाचणी तसेच लसीकरण करण्याचे काम वेगाने होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!