औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुरुवातीला आरटीपीसीआर चाचणी हा एकमेव पर्याय होता. मात्र काही महिन्यांनंतर अँटिजेन किटचा पर्याय समोर आला. ज्यातून अवघ्या अर्ध्या तासात पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह अहवाल मिळू लागला. किंमतीतही आरटीपीसीआरपेक्षा कमी असलेल्या या अँटिजेन किट्सचा वापर वाढला. मात्र चाचण्या शंभर टक्के परिणामकारक नसल्याचे वारंवार समोर येत आहे. ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीआर चाचण्यांमधून तब्बल ७०७ जण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
शहरात गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरुवातीस बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची आरटीपीआर चाचणी केली जात होती. आयसीएमआरने या चाचणीला गोल्ड स्टॅन्डर्ड मानले आहे. पण नंतर तातडीने रिझल्ट देणाऱ्या रॅपीड ॲन्टीजेन चाचण्यांचा प्रकार समोर आला. आरटीपीआर चाचण्यांचा निकाल येण्यासाठी पूर्वी २४ तास लागत होते तर आता १२ तासात निकाल मिळतो.
संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने बाजूला करून त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका कमी करण्यासाठी ॲन्टीजेन चाचण्यांना प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी कोरोनाबाधिताच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. ॲन्टीजेन चाचणीत निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत तब्बल ७०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
ॲन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण अधिक
महापालिकेने केलेल्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरपेक्षा ॲन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेने आत्तापर्यंत सहा लाख २५ हजार ६१३ चाचण्या केल्या आहेत. त्यातील चार लाख ३४ हजार ८९४ जण निगेटिव्ह आले असून, ७१ हजार ९९७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त चाचण्या ॲन्टीजेन पद्धतीच्या आहेत.
आरोग्य अधिकारी म्हणतात..आरटीपीसीआर कराच
अॅन्टीजेन चाचण्यांमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत ७०७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे संशयितांनी ॲन्टीजेन चाचण्यांच्या भरवशावर न राहता शंभर टक्के परिणामकारक असलेली आरटीपीसीआर चाचणी देखील करून घ्यावी.
-निता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही’ दोन करणे सांगून आपण कुठेही फिरू शकतो…निर्बंधांतील विसंगतीमुळे सोशल मिडीयावर विनोदांचा पाऊस
- शिवभोजन चालु पण संचार बंद… मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मिम्सचा पाऊस
- ‘ज्याला कावीळ झालीय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं’
- ‘शिवभोजन सेंटर सुरु कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांच काय ?’
- कोरोनामुळे आई-मुलाची कायमची ताटातूट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

