परभणी : उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून गारवा जाणवू लागला आहे. दक्षिणेकडील समुद्रसपाटीकडून येणारे आर्द्रतायुक्त ईस्टरली वारे बंद झाले आहेत. बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान सेवा केंद्रात ९.१ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात गारवा जाणवत होता. त्यानंतर किमान तापमानात वाढ झाली. डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात हुडहुडी भरेल अशी थंडीची लाट आली. मात्र, काही दिवसातच ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरली होती. २० डिसेंबर रोजी ७.०, २१ डिसेंबरला ५.१, २३ डिसेंबरला ५.५, २७ डिसेंबरला ९.२ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली होती.
त्यानंतर मात्र दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त ईस्टरली वाऱ्यामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. यादरम्यान किमान तापमान ११ ते १७ अंश सेल्सियसदरम्यान होते. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून कृषी विद्यापीठातील हवामान सेवा केंद्रास प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस १२ ते १५ अंश सेल्सियसदरम्यान किमान तापमान राहील. तसेच आकाश स्वच्छ राहील. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते.
महत्वाच्या बातम्या
- गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले खिळे शेतकऱ्यांनी उपसले!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

